सावंतवाडी : प्रतिनिधी
सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी मध्ये बुधवार दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी दहिहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी नर्सरी, ज्युनिअर व सिनिअर केजीची मुले बालकृष्ण व राधेच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाली होती. प्रशालेच्या मैदानावर दहिहंडी फोडून चिमूकल्यांनी आनंदाने उत्सव साजरा केला. यावेळी बहुसंख्य पालकवर्ग देखील सहभागी झाला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती सिंड्रेला परेरा, श्रीमती सेलिन बर्नार्ड, श्रीमती आकाशवाणी सावंत, श्रीमती कल्पना निकम या शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमासाठी सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोसले, विश्वस्त युवराज्ञी श्रदधाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक- शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.