प्रतिनिधी /फोंडा
दक्षिण गोव्याचे माजी खासदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांच्या लेखसंग्रहाचे प्रकाशन गुरुवार 29 रोजी सकाळी 11 वा. खडपाबांध-फोंडा येथील विश्वहिंदू परिषद सभागृहात होणार आहे. प्रकाशन सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, कृषीमंत्री रवी नाईक, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर व सावर्डे मतदारसंघाचे आमदार गणेश गावकर हे उपस्थित राहणार आहेत. साहित्यप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे गोमंत संवर्धन संस्था व मित्रपरिवारातर्फे कळविण्यात आले आहे.