सावंतवाडी : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस आज सर्वपक्षीय पदाधिकांकडून उत्साहात साजरा करण्यात आला. आपला वाढदिवस करणाऱ्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आपण ऋणी असून हा वाढदिवस माझ्या जीवनातील मोलाचा क्षण आहे. तुम्ही सर्वांनी दिलेले प्रेम कधी न विसरता येणारे आहे. अशी प्रतिक्रिया श्री. दळवी यांनी यावेळी दिली. त्यांच्या निवासस्थानी हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, भास्कर परब, शिवदत्त घोगळे, बाळ कनयाळकर, नकुल पार्सेकर, समीर वंजारी, नझिर शेख, देवेंद्र टेमकर, युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, हिदायतुल्ला खान, सचिन पाटकर, सावली पाटकर, राकेश नेगी, बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल, बाबल्या दुभाषी, याकुब शेख, नियाज शेख, बावतीस फर्नांडिस, मारीता फर्नांडिस, पुजा दळवी, श्रीया दळवी, भुवन दळवी, विनायक परब, बाळ सावंत, अजय गोंदावळे, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, परिक्षीत मांजरेकर, निलेश मेस्त्री, किशोर सावंत, योगेश चांदेलकर, संदीप गवस, सुदेश तुळसकर, वैभव परब, सायली दुभाषी, प्रसाद दळवी, अमोल दळवी, प्रिया परब आदी उपस्थित होते