पुणे / वार्ताहर :
माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेलेले पुणे पोलीस दलातील पोलीस नाईक स्वप्नील गरड यांचा ब्रेन डेड झाला. त्यांना उपचारासाठी काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे गरड यांच्या पोलीस दलातील मित्रांकडून सांगण्यात येते.
स्वप्नील गरड हे पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. ते एक चांगले गिर्यारोहकही आहेत. काही दिवसांपूर्वी ते एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी गेले होते. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा ब्रेन डेड झाला आहे. सध्या त्यांच्यावर काठमांडू येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गरड यांनी मागील वषी नेपाळमधील माउंट अमा दबलम हे चढाईसाठी अवघड शिखर सर केले होते.