झेलेन्स्की-बिडेन भेटीदरम्यान रशियन राष्ट्राध्यक्षांचे भाष्य ः युक्रेनसह मित्रराष्ट्रांना वक्तव्याबाबत साशंकता
मॉस्को / वृत्तसंस्था
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युपेनसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्याची इच्छा व्यक्त केली. युपेनसोबतचे हे युद्ध लवकरात लवकर संपवणे हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. युपेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अमेरिका दौऱयावर असताना पुतीन यांचे हे वक्तव्य आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच युपेन आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी पुतीन यांच्या या वक्तव्यावर साशंकता व्यक्त केली आहे. फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या रशिया-युपेन युद्धाला आता 10 महिने होत आले आहेत.
युपेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की सध्या अमेरिकेच्या दौऱयावर आहेत. याचदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी, 22 डिसेंबर रोजी आपल्याला युद्ध संपवायचे असून त्यात राजनैतिक तोडगा काढणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. ‘हा संघर्ष संपवणे हे आमचे ध्येय आहे. युद्ध संपवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि राहू. हे सर्व लवकरात लवकर संपेल याची खात्री करण्याचा आम्ही प्रयत्न करू’, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना अध्यक्ष पुतीन म्हणाले.
याप्रसंगी पुतीन यांनी युपेनला पुरवल्या जाणाऱया अमेरिकन पॅट्रियट डिफेन्स सिस्टीमबद्दलही भाष्य केले. युपेनला अमेरिका पुरवत असलेली पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टीम ही अमेरिकेची जुनी शस्त्रास्त्र प्रणाली असून रशिया तिचा मुकाबला करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणाले. त्याचा मुकाबला करण्यासाठी रशियाकडे ए-300 प्रणाली असल्याचा दावा त्यांनी केला.
शत्रूला समजून घेतले पाहिजे!
पुतीन यांनी पहिल्यांदाच युपेनच्या विशेष लष्करी कारवाईला जाहीरपणे युद्ध म्हटले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमेरिका रशियाला कमकुवत करण्यासाठी युपेनचा वापर करत असल्याचा आरोप केला. तसेच कोणताही मार्ग असो, सर्व संघर्ष संपुष्टात येतात. आपल्या शत्रूला हे जितक्मया लवकर समजेल तितके चांगले, असेही ते पुढे म्हणाले.
अमेरिकेचे प्रत्युत्तर
पुतीन यांच्या युद्ध संपविण्याच्या इच्छेवर अमेरिकेनेही प्रत्युत्तर दिले आहे. पुतीन यांनी कोणत्याही प्रकारच्या करारासाठी तयार असल्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत, असे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोन किर्बी यांनी सांगितले. युपेनमध्ये पुतीन जे करत आहेत ते युद्ध संपवण्याच्या त्यांच्या दाव्याच्या अगदी उलट आहे. आपले राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे युद्ध संपवण्यासाठी पुतीन यांच्याशी चर्चेसाठी तयार आहेत, मात्र त्यासाठी रशियाला गांभीर्यपूर्णतेने पुढे यावे लागेल, असे किर्बी यांनी नमूद केले. नुकतीच अमेरिकेने युपेनला 1.85 अब्ज डॉलरची लष्करी मदत जाहीर केली होती.
रशिया-युपेन युद्ध 10 महिन्यांपासून सुरू
गेल्या 10 महिन्यांपासून रशिया-युपेन युद्ध सुरू आहे. सध्या तरी हे युद्ध थांबताना दिसत नाही. रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युपेनवर आक्रमण केले. या युद्धात हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.