राधानगरी /महेश तिरवडे
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरण 85 टक्के इतके भरले असून असाच पावसाचा जोर राहिल्यास येत्या दोन ते चार दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे,
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात २११ मिलिमीटर इतका यावर्षीचा उच्चांकी पाऊस झाला. दिवसभरातील आठ तासात ७० मिलिमीटर तर १ जून ते आजपर्यंत १९९० मिलिमीटर पाऊस झाला आहे, आज दुपारी 4 वाजता पाणी पातळी 340.50फूट व पाणीसाठा 7083.75 द ल घ, फूट इतका आहे, अद्याप धरण भरण्यास 8 फूट कमी आहे, सध्या धरण ८५ टक्के भरले असून धरणातून १४०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे.त्यामुळे भोगावती नदीपात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे