पणजी : मुसळधार पावसाने काल बुधवारीही संपूर्ण गोव्याला झोडपून काढले. वाळपईमध्ये 8 इंच तर सांखळीत 7 इंच पावसाची नोंद झाली. संपूर्ण गोव्यात दिवसभरात सरासरी 3.50 इंच एवढी पावसाची नोंद झाली. आगामी 24 तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला असून ‘ऑरेंज अलॅर्ट’ जारी केला आहे. संपूर्ण गोव्याला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे राज्यातील सर्व नद्या या धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचल्या. सांखळीची वाळवंटी नदी धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचली, मात्र नंतर पावसाचा जोर मंदावल्याने पुराचा धोका टळला. बुधवारी दिवसभर सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले. राज्यात जोरदार पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत यंदाच्या मोसमात सरासरी 70 इंच एवढा पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो 12 इंच अधिक आहे. मंगळवारी रात्री मुसळाधार पावसाने सांखळी व सत्तरीत थैमान घातले. अनेक नद्या दुथडी भऊन वाहू लागल्या पूरसदृशस्थिती निर्माण झाली. काल बुधवारी सायंकाळी हवामान खात्याने येलो अलॅर्ट जारी केला. उद्यापासून पावसाचा जोर थोडा कमी होईल. 22 व 23 जुलै रोजी काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. बुधवारी दिवसभरात जुने गोवे 1.50 इंच, म्हापसा, 1.50 इंच, वाळपई 1.50 इंच पणजी व मडगाव प्रत्येक 1 इंच पावसाची नोंद झाली.
Next Article इफ्फीत यंदा ‘सर्वोत्कृष्ट वेब सीरिज’ पुरस्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.