Rajarambapu Sahakari Bank Ed Raid Sangli : सांगलीत राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात ईडीने छापे टाकले आहेत.ईडीनं काल पश्चिम महाराष्ट्रात एकूण 14 ठिकाणी छापे टाकले.याचसोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित बँकेवर ईडीने छापा टाकला आहे.10 वर्ष जुन्या एक हजार कोटींच्या व्यवहाराचा तपास सुरु आहे. बनावट कागदपत्रांनी बँकेत खाती उघडून मोठ्या रकमा वळत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार जी.एस.टी विभागाने केली होती. घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सहभागी असल्याचा ईडीला संशय आहे.
- राजारामबापू बँकेचं प्रकरण काय आहे?
- मूळ प्रकरण हे 2011 सालचं आहे
- व्हॅट चुकवण्यासाठी काही कंपन्यांकडून पैशाचा फेरफार
- काही उद्योजकांनी आधी बेनामी कंपन्या स्थापन केल्या
- बेमानी कंपन्यांकडून माल विकत घेतल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं
- बोगस मालाच्या बदल्यात बेनामी कंपन्यांच्या खात्यात पैसे जमा केले
- नंतर हे पैसे रोख स्वरूपात काढून घेतले
- नेमक्या याच बोगस व्यवहारांमध्ये बँकेनं सहकार्य केल्याचा संशय आहे
- बँकेतील काही कर्मचारी सामिल असल्याचा ईडीला संशय आहे
- या सर्व प्रकरणात एक हजार कोटींचा फेरफार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याच प्रकरणामध्ये ईडीने छापेमारी केलीय.