नवी दिल्ली
भारतीय बाजारातील सर्वात मोठी तेल व गॅस उत्पादक कंपनी ओएनजीसीच्या अंतरिम चेअरमनपदी राजेशकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिसरे अंतरिम चेअरमन कंपनीला लाभले असून अद्यापही सरकारकडून पूर्ण कालावधीसाठी या पदावर नियुक्ती करण्यात आलेली नाही. श्रीवास्तव हे वरि÷ संचालक म्हणून कार्यरत आहेत. सध्याची त्यांची नियुक्ती 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2022 या चार महिन्यांच्या कालावधीसाठी असेल.