डेरा सच्चा सौदाची राजकीय शाखा विसर्जित ः निवडणुकीत कुणाचेच समर्थन करणार नाही
वृत्तसंस्था / चंदीगड
साध्वींचे लैंगिक शोषण आणि हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमने राजकारणापासून अंतर राखण्याचा निर्णय घेला आहे. राम रहिमने स्वतःच्या डेऱयाची राजकीय शाखा विसर्जित केली ओ. आता डेऱयाची कुठलीच राजकीय शाखा नसेल असे त्याने स्वतःच्या अनुयायांना सांगितले आहे. निवडणुकीत कुठल्या पक्षाला समर्थन करायचे याचा निर्णय हीच राजकीय शाखा आतापर्यंत घेत होती. मतदानाच्या 24 तासांपूर्वी स्वतःच्या नेटवर्कद्वारे डेऱयाच्या लाखो अनुयायींपर्यंत यासंबंधीचा संदेश पोहोचविला जात होता.
डेरा सच्चा सौदाच्या राजकीय शाखेची स्थापना 2007 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. डेरा सच्चा सौदा कधीच उघडपणे कुठल्याही राजकीय पक्षाला समर्थन देत नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी डेरा प्रमुखाने राजकीय शाखा विसर्जित करण्याचा निर्णय घेत अनेकांना चकित केले आहे.
डेरा आता समाजसेवेवर लक्ष केंद्रीत करू इच्छित असल्याचे हा निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात येते. राम रहिम तुरुंगातून वारंवार पेरोलवर बाहेर आल्याने अनेक राजकीय पक्षांनी भाजपला लक्ष्य केले आहे. अशाप्रकारच्या वादापासून वाचण्यासाठी राम रहिमने राजकीय शाखा विसर्जित केल्याचे मानले जात आहे. पंजाब–हरियाणात कार्यरत जवळपास सर्वच डेऱयांची राजकीय शाखा असते. काही डेऱयांमध्ये ही शाखा अधिकृत स्वरुपात काम करते तर काही डेऱयांमध्ये याचे गुप्त कामकाज चालत असते. पंजाब–हरियाणा आणि हिमाचलमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीपूर्वी समर्थन मिळविण्यासाठी या डेऱयांमध्ये शरण घेण्यासाठी पोहोचतात. यावरून वाद देखील होत असतो. अशा स्थितीत डेरा सच्चा सौदा आता कुठल्याही पक्षाला उघडपणे पाठिंबा देताना दिसून येणार नाही.