रशियन महिलांची सैनिक पतींना सूचना ः इंटरसेप्टवर रिकॉर्ड संभाषण व्हायरल
रशियाच्या एका महिलेने सैनिक असलेल्या स्वतःच्या पतीला युक्रेनियन महिलांवर बलाकार करण्यास सांगितल्याचे समोर आले आहे. रशियन महिलेने बलात्कार कताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सैनिक असलेल्या पतीला सांगितले होते.
द सिक्युरिटी सर्व्हिस ऑफ द युक्रेनच्या इंटरसेप्टरने रशियन सैनिक आणि त्याच्या पतीचे फोनवरील संभाषण रिकॉर्ड केले आहे. यात रशियन सैनिक आाि त्याच्या पत्नीदरम्यान युक्रेनियन महिलांवर बलात्कार करण्यासंबंधीचे संभाषण आहे. संभाषणाची ही ध्वनिफित टेलिग्राम चॅनेलवर व्हायरल आहे.
युद्धाला समर्थन दर्शविणाऱया 80 टक्के रशियन महिला युक्रेनच्या महिलांवर बलात्कार करण्याच्या क्रूरकृत्याला योग्य मानत असल्याचे या ध्वनिफितीद्वारे समोर आले आहे. रशियन महिला स्वतःच्या पतीला युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा असे सांगताना ऐकू येत. बलात्कार केल्यावर मी तुला काहीच सांगू नको का असे सैनिक पती स्वतःच्या पत्नीला सांगत होता.
मी खरोखरच कुणाचा बलात्कार करू का असे पतीने विचारल्यावर रशियन महिलेने तुम्ही स्वतःच्या सुरक्षेकरता हे सर्वकाही करू शकता असे सांगितले होते. रशियन सैनिकांवर शेकडो महिलांवर बलात्काराचा तसेच मुलांचे लैंगिक शोषण करण्याचा आरोप झाला असताना ही ध्वनिफित समोर आली आहे.
पतीसमोरच बलात्कार
बंदुकीचा धाक दाखवत माझ्या पतीसमोरच रशियन सैनिकाने बलात्कार केल्याचा आरोप युक्रेनमधील 50 वर्षीय महिला एना यांनी केला होता. बलात्कारानंतर रशियन सैनिकाने एना यांच्या पतीला गोळय़ा घालून ठार केले होते. रशियाचे सैनिक मारेकरी असून ते नेहमीच नशेत असतात, त्यांच्यातील बहुतेक जण खुनी, लुटारू आणि बलात्कारी असल्याचे एना यांनी म्हटले आहे.