पासून पर्यंत रविपावार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार
6ः00 AM 7ः30 AM उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चर काल
7ः30 AM 9ः00 AM चर काल उद्वेग अमृत रोग लाभ शुभ
9ः00 AM 10ः30 AM लाभ शुभ चर काल उद्वेग अमृत रोग
10ः30 AM 12ः00 PM अमृत रोग लाभ शुभ चर काल उद्वेग
12ः00 PM 1ः30 PM काल उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चर
1ः30 PM 3ः00 PM शुभ चर काल उद्वेग अमृत रोग लाभ
3ः00 PM 4ः30 PM रोग लाभ शुभ चर काल उद्वेग अमृत
4ः30 PM 6ः00 PM उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चर काल
शुभारंभ – वर्षारंभ !!!
सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामयाः कोणतेही काम शुभ वेळेला केले की यश मिळण्याची शक्मयता जास्त असते. म्हणून हा कागद जपून ठेवावा. 1 घटिका म्हणजे 24 मिनिटे. अशा चार घटिका म्हणजे एक शिव मुहूर्त किंवा चोघडीया (96 मिनिटे). खाली दिलेल्या टेबलमध्ये जिथे शुभ लिहिले आहे त्यावेळी धार्मिक, शैक्षणिक, विवाहाची बोलणी इत्यादी कामे, जिथे लाभ लिहिले आहे तिथे ऍडमिशन घेणे, व्यवसाय सुरू करणे, अमृत लिहिले आहे त्यावेळी आणि सगळय़ा प्रकारची शुभ कामे विशेषता दुधाशी संबंधित, चर लिहिले आहे तिथे मनोरंजन/सांस्कृतिक कामे, काल लिहिले आहे तिथे मशीन आणि कृषीसंबंधीची कामे, रोग लिहिले आहे तिथे वाद-विवाद, उद्वेग लिहिले आहे तिथे सरकार संबंधित कामे करू शकता. शुभ चौघडिया — शुभ (स्वामी गुरु), अमृत (स्वामी चंद्र), लाभ (स्वामी बुध) मध्यम चौघडिया — चर (स्वामी शुक्र) अशुभ चौघडिया — उद्वेग (स्वामी सूर्य), काल (स्वामी शनि), रोग (स्वामी मंगळ). इथे सुर्योदय 6 वाजता धरला आहे. तुमच्या गावाच्या सुर्योदयाप्रमाणे वेळ धरावी.
मेष
वर्षारंभी तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. संसर्गजन्य आजारांचा त्रास होऊ शकतो. कुटुंबातील वाद विवाद बाहेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू देऊ नका. प्रवासात महत्त्वाच्या कागदपत्रांना सांभाळावे लागेल. जमिनीच्या व्यवहारांना सध्याला स्थगिती दिलेली बरी. छोटय़ा-मोठय़ा गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद असेल.
उपाय केशराचा टिळा लावावा
वृषभ
चुकीचे खानपान कुपथ्य करणे हे तब्येतीच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते त्यामुळे आहार-विहार यावर ध्यान द्या. सगळय़ा प्रकारचे लाभ होण्याची शक्मयता आहे. मित्रांची साथ संगत लाभेल. मान सन्मानात वाढ होऊन कामाच्या ठिकाणी कामे पूर्ण होतील. कुटुंबात छोटे-मोठे वाद होण्याची शक्मयता आहे. उधळपट्टी करू नका. प्रॉपर्टीच्या कामामध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधात सुधारणा होईल.
उपाय वडाच्या पानावर अष्टगंधाने स्वस्तिक काढून जवळ ठेवावे
मिथुन
तब्येतीची योग्य ती काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन त्रास होऊ शकतो याकरता आत्ताच सावध व्हावे. धनप्राप्ती करता संघर्ष करावा लागेल. कौटुंबिक वातावरण म्हणावे तसे असणार नाही. एखाद्या व्यक्तीचा हट्टीपणा त्रास देऊ शकतो. प्रवासाचे उत्तम योग आहेत. त्यातून फायदाही संभवतो. प्रॉपर्टीच्या कामांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मदतीमुळे यश मिळण्याची शक्मयता आहे. गुंतवणूकीतून फायदा होऊ शकतो.
उपाय मंदिरात केळी दान द्यावी
कर्क
वर्षाच्या सुरुवातीला आत्मविश्वासाचामध्ये थोडी कमी होऊ शकते. तब्येतीलादेखील सांभाळावे लागेल. धनप्राप्ती उत्तम असल्याने आणि कुटुंबिक वातावरण चांगले असल्याने समाधान वाटेल. प्रवासामध्ये नवीन ओळखी होतील आणि त्यामधून लाभ होऊ शकतो. कागदपत्रे व्यवहारात यश मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदी विक्री मध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध मधुर होतील. नोकरदार वर्गाने सावध रहावे.
उपाय हळदीचा टिळा लावावा.
सिंह
आरोग्याच्या बाबतीत भाग्यवान असलेली रास तुमची आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बेसावध राहावे. परिवारातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. बोलण्याचे कौतुक होईल. तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे दुसऱयाचा फायदा होईल. कागदोपत्री व्यवहार तुम्ही चोख असल्याने नुकसान टळेल. जमीन जुमल्याच्या बाबतीत भाग्यवान असाल. प्रेमप्रकरणात गैरसमजामुळे ताण तणाव येऊ शकतो. शेअर बाजारापासून दूर रहा.
उपाय केळीचे मूळ जवळ ठेवावे
कन्या
वर्षाची सुरुवात उत्साहपूर्वक आणि आत्मविश्वासाने कराल. तुम्ही केलेल्या मदतीमुळे कुटुंबातील सदस्यांचा फायदा होईल. एखाद्या जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. जुने मित्र भेटू शकतात. जमिनीचे व्यवहार करत असताना सावध राहण्याची गरज आहे. शेअर बाजारासारखी धोकादायक गुंतवणूक करण्यापूर्वी चार चौघांचा सल्ला जरूर घ्यावा. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे चीज होईल. वैवाहिक सुख उत्तम असेल.
उपाय नदीत तांब्याचे नाणे सोडावे
तूळ
बाहेरील खाणे पिणे टाळावे. प्रवासाचे योग आहेत. घरच्यांची उत्तम साथ मिळेल. जमिनीचे व्यवहार फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीचे योग आहेत. प्रेमप्रसंगात यश मिळेल. छोटय़ा लाभाची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला त्रास जाणवेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो.
उपाय- शुक्रवारी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा
वृश्चिक
आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्मयता आहे. वर्षारंभी तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. धनप्राप्ती कष्टांनी होईल. प्रवासात नुकसानीची शक्मयता आहे. वाहन आणि स्थावर जमिनीचे सुख उत्तम मिळेल. प्रेमप्रसंगात निराशा होऊ शकते. नोकरदारांना चांगले दिवस आहेत. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. मान सन्मान प्राप्त होईल.
उपाय- पांढरे तीळ घालून चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे
धनु
भाग्य उत्तम असेल. दोषयुक्त हवेमुळे तब्येतीच्या तक्रारी होऊ शकतात. घरातील वातावरण चांगले असेल. पैशांची आवक उत्तम राहील. कामानिमित्त प्रवास घडू शकतो. भावंडांचे सहकार्य मिळेल. ज्येष्ठ स्त्रीशी मतभेद होऊ शकतात. शेअर्समधून लाभ होईल. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. दूरच्या प्रवासाचे योग असले तरी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
उपाय- पिवळे वस्त्र दान करावे
मकर
वर्षारंभ चांगला असेल. भावा बहिणीचे सहकार्य मिळेल. आरोग्याची चिंता राहील. प्रवास टाळावा. वृद्ध व्यक्तीशी भांडणाची शक्यता आहे. जमिनीचे व्यवहार टाळावेत. गुंतवणुकीतून लाभ संभवतो. नोकरदारांना प्रमोशनचे योग आहेत. वैवाहिक जीवनात तणाव असेल. भाग्याची उत्तम साथ आहे. कर्तबगारीमध्ये वाढ होईल.
उपाय- दुपारी बारा ते एकच्या दरम्यान दत्त दर्शन घ्यावे.
कुंभ
घरात खेळीमेळीचे वातावरण असेल. प्रवासातून लाभ होईल .नवीन योजना बनवाल. वाहन सुख उत्तम असेल. आईचे सहकार्य मिळेल. प्रेम प्रसंगात मधुरता निर्माण होईल. नोकरदारांना कष्टाचा काळ आहे. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. भाग्याची उत्तम साथ मिळेल. लाभाच्या संधी मिळतील. लांबच्या ठिकाणाहून फायदा होईल.
उपाय- गाईला चपाती आणि गूळ खायला खायला घाला
मीन
तब्येतीची साथ राहील. वस्तू गहाळ होण्याची शक्मयता आहे. घरामध्ये वाद होऊ देऊ नका. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रवास घडेल. जमिनीच्या वादामध्ये यश मिळेल. वाहन खरेदीचे योग आहेत. छोटय़ा गुंतवणुकीतून मोठा लाभ होण्याची शक्मयता आहे. प्रेमप्रसंगात यश मिळेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. आपले काम चोख करावे.
उपाय- बांधकाम मजुरांना ताक द्यावे