मंगलविधीची आचारसंहिता
बुधवार. दि. 24 ते मंगळवार 30 ऑगस्ट 2022 पर्यंत (दुसरा भाग)
आता पूजेला सुरुवात करूया. लक्षात घ्या की त्या पराशक्तीने आम्हाला सूर्यचंद्राचा प्रकाश दिला म्हणून दोन निरांजने आपण लावतो, त्यांनी आपल्याला सुगंध दिला म्हणून सुगंधी अगरबत्ती लावतो, स्वर दिला म्हणून आपण आरती गातो, अन्न दिले म्हणून आपण प्रसाद दाखवतो. संस्कृत ही देवांची मातृभाषा. पण ज्यांना संस्कृत मध्ये मंत्र म्हणता येतात त्यांनी संस्कृतमध्ये म्हणावे कारण त्या शब्दांच्या ध्वनी कंपनांचा परिणाम हा वेगळाच असतो. ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनी आपल्या भाषेमध्ये पूजा केली तरीही हरकत नाही.
पूजा करण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ करून धुतलेले कपडे घालावे. शक्य असल्यास सोवळे नेसावे. कपाळी टिळा लावावा. पूजेचे सगळे सामान जवळ ठेवावे. आसनावर किंवा पाटावर बसावे. जमिनीवर बसून किंवा उभे राहून पूजा करू नये. एक-दोन मिनिटे शांत बसून मनातल्या मनात आपल्याला गणेशपूजनाचे भाग्य लाभले आहे याकरता परमेश्वरी शक्तीला धन्यवाद द्यावे. आपण जरी स्वच्छ असलो तरी मानसिक शुद्धी आणि आंतरिक शुद्धी ही गरजेची आहे ना? ती व्हावी म्हणून, शरीर, मन आणि आत्मा यांच्या शुद्धीकरता तीनदा पळीने पाणी प्यावे. आपल्या तळहातावर पाच पवित्र तीर्थे आहेत. देव, पितृ, ब्रह्म, प्रजापती आणि सौम्य तीर्थ. म्हणून पळीभर पाणी तळहातावर घेऊन तीनदा प्यायचे आहे. प्रत्येक वेळी पाणी पिताना हे केशवा, हे नारायणा, हे माधवा माझा उद्धार कर मला पवित्र कर ही प्रार्थना करायची आहे. नंतर हात धुऊन घ्यायचा. हात धुताना हे गोविंदा तुझी कृपा माझ्यावर असू दे अशी प्रार्थना करावी. संकल्पाचे महत्त्व वेगळे आहे. म्हणून हातात थोडय़ा अक्षता घेऊन त्यावर थोडे पाणी घेऊन डोळे मिटावे आणि मनातल्या मनात स्वतःचे नाव आणि गोत्र उच्चारून वेळ, ग्रह, तारे, जागा हे सर्व परमेश्वराची अगाध लीला आहे आणि त्याच्याच कृपेने श्रीमहागणेशाचे पूजन मी करतोय, ते स्वीकार व्हावे, मला आणि माझ्या कुटुंबीयांना श्रीगणेशाच्या कृपेचा अनुभव पदोपदी यावा म्हणून हे पूजन मी करत आहे असे म्हणून पाणी सोडावे. हात धुऊन-पुसून घ्यावा. तुपाचा दिवा लावावा. ज्योतीकडे पहात प्रार्थना करावी की हे तेजा, माझे आत्मतेज जागृत कर. अक्षता आणि फुले दिव्याखाली ठेवावी, नमस्कार करावा. याच पद्धतीने घंटा आणि कलश पूजन करावे. कलशातले पाणी सर्वत्र शिंपडावे. मूर्ती ही प्रतिकात्मक आहे. गणेशाला मूर्तीमध्ये बोलावण्याची क्रिया म्हणजे प्राणप्रतिष्ठा आपला डावा हात आपल्या हृदयावर असा ठेवावा की ठोके हाताला जाणवतील. उजवा हात प्रतिमेच्या हृदयावर ठेवावा. डोळे बंद करावे. आपल्या हृदयातून प्रतिमेच्या हृदयात गणेश तत्व प्रवाहित होत आहे असे अनुभवून पंधरा वेळा ‘ह्रि’ मंत्राचा जप करावा. कृतज्ञतेने डोळे उघडावे, नमस्कार करावा. आपल्या घरी आपली आवडती व्यक्ती पाहुणा म्हणून आली की आपण ज्याप्रमाणे अगत्याने तिचा पाहुणचार करतो त्याप्रमाणेच आपण आपल्या आवडत्या गजाननाचे आदरातिथ्य करायचे आहे. आपण आलेल्या व्यक्तीचे हात पाय धुतो, चहापाणी पाजतो, जेवू घालतो, फलाहार देतो, नवीन वस्त्र देतो, त्याने येण्याची कृपा केली म्हणून आग्रहाने प्रेमस्वरूपात जसा जमेल तसा खर्च करतो. हे सगळे आपल्याला आपल्या गणपतीबाप्पा बरोबर करायचे आहे आपण पाहुण्यांना ‘या स्वागत आहे’ असे म्हणतो. हातात अक्षता घेऊन डोळे मिटावे आणि ‘हे महागणेशा माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यात आणि घरात तुझे स्वागत आहे’ असे म्हणून या अक्षता मूर्तीवर घालाव्यात. हातात दूर्वा घेऊन ‘हे महागणपती तुझ्यामुळे माझ्या घराला स्थिरत्व आहे, म्हणून प्रतिमात्मक रूपाने हे आसन ग्रहण कर’ असे म्हणून त्या दूर्वा गणपतीच्या उजव्या बाजूला वहाव्यात. पाद्यपूजा करायची आहे. म्हणून ‘हे लंबोदरा, माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या मानसन्मानात वृद्धी होऊ दे’ असे म्हणून दुर्वांनी किंवा फुलाने मूर्तीच्या पायावर पाणी शिंपडावे. ‘हे गणपती, तुझ्या कृपेने मला आणि माझ्या कुटुंबीयांना सगळीकडे यश प्राप्त होवो’ असे म्हणून गंध, फूल, अक्षता असलेले पाणी शिंपडावे. ‘हे विघ्नहर्त्या तुझ्या कृपेने माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यात पवित्रता येवो असे म्हणून कापूर घातलेले पाणी शिंपडावे. ‘हे गुणाधीशा, तुझ्या कृपेने आमच्या जीवनात मंगलता येऊ दे’ असे म्हणून आपल्याला गणपतीचा जो मंत्र येतो किंवा स्तोत्र येते त्या स्तोत्राने पंचामृताने आणि नंतर दुर्वेने थोडे थोडे पाणी शिंपडत रहावे आणि प्रतिमा स्वच्छ टिपून घ्यावी. त्यानंतर ‘तुझ्या कृपेने आम्हाला मानसन्मान मिळावा म्हणून हे वस्त्र अर्पण करत आहे’ असे म्हणून कापसाचे किंवा प्रत्यक्ष नवीन वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर गणपतीला जानवे घालावे. ‘हे महागणपती चंदनाचा स्वीकार आणि आमच्या आयुष्यात मांगल्याचा सुगंध येऊ दे’ असे म्हणून कुंकू चंदन किंवा अष्टगंध लावावे.
मेष
कष्टाचे सगळे फळ मिळवून देणारा हा काळ असेल. त्यामुळे संधीचे सोने करायला विसरू नका. धनप्राप्ती आणि पैशाची बचत या दोन्ही बाजूने अनुकूल काळ आहे. प्रवास घडेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला मात्र काहीसा त्रास संभवतो. वैवाहिक जीवनामध्ये हट्टीपणामुळे वादावादी होण्याची शक्यता आहे. अपघातापासून सावध रहा. मित्रांशी चर्चा करून प्रॉब्लेम दूर होतील.
उपाय ः गळय़ात लाल धागा बांधावा
वृषभ
या राशीच्या लोकांनी तब्येतीची चिंता करण्याची गरज नाही. छोटय़ा-मोठय़ा गोष्टी सोडल्या तर तब्येत ठीकठाक असेल. धनप्राप्ती उत्तम असेल. कौटुंबिक समाधान मिळेल. मानसन्मानाची प्राप्ती होईल. प्रवास घडण्याची शक्यता आहे. शेअर्ससारख्या धोकादायक गुंतवणुकीपासून मात्र दूर रहा. नोकरीमध्ये ताणतणावाला सामोरे जाल. वैवाहिक सुख उत्तम असेल.
उपाय ः आंघोळीच्या पाण्यात चमचाभर दूध घालून आंघोळ करावी.
मिथुन
प्रवासातून लाभाची शक्मयता नाकारता येत नाही. घरातील वातावरण चांगले असेल. चर्चा करून निर्णय घ्याल. जमिनीचे व्यवहार सध्याला टाळलेले बरे. प्रेमात फसवणुकीची शक्यता आहे. मन चंचल राहील. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होऊन पगारवाढ मिळू शकते. वैवाहिक जोडीदाराशी भांडण होऊ शकते. देव दर्शनाकरता प्रवास होईल. दुरून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे.
उपाय ः गाईला हिरवा चारा घालावा.
कर्क
योजलेल्या गोष्टी पूर्ण होतील. काही अडचण येण्याची शक्मयता आहे पण त्या अडथळय़ांवर मात कराल. पैशांची बचत करण्याकडे कल असेल. प्रवास करताना सावध राहण्याची गरज आहे. जमिनीचे व्यवहार सध्या टाळलेले बरे. प्रेमसंबंधात वाढ होईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडेल. नोकरीमध्ये नको त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ येईल.
उपाय ः रुद्राभिषेक करावा.
सिंह
जवळच्या माणसाकडून दगाफटका होण्याची शक्मयता आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्मयतो टाळावा. भावंडांशी मतभेद होण्याची शक्मयता आहे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेमसंबंधात ताण-तणाव येईल. नोकरीमध्ये नावलौकिक वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. व्यवसाय वृद्धीचे संकेत आहेत. लाभ होतील.
उपाय ःदीपदान करावे.
कन्या
तब्येतीला सांभाळून काम करण्याची गरज आहे. अतिरिक्त तणावाचा परिणाम शारीरिक व्याधीमध्ये होऊ शकतो. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. कष्टाला गत्यंतर नाही. प्रवास घडेल आणि त्यातून फायदा होईल. आईच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये कौतुक होईल. वैवाहिक जीवनातील तणाव जाईल.
उपाय ः पिंपळाला प्रदक्षिणा घालावी.
तुळ
आरोग्याची समस्या भेडसावू शकते. दुखणे अंगावर काढू नका. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवास करताना सावध रहा. वस्तू गहाळ होण्याची शक्मयता आहे. प्रेम संबंधांमध्ये वृद्धी होईल. करमणुकीकडे कल असेल. नोकरीतील समस्या दूर होतील. जोडीदाराची साथ मिळेल. अपघातापासून सावध रहा. एखादी गुप्त बातमी कळेल. मन धार्मिकतेकडे झुकू शकते. मान-सन्मानात वाढ होईल.
उपाय ः मंगळवारी गणेश दर्शन घ्यावे.
वृश्चिक
तब्येतीच्या बाबतीमध्ये निश्चिंत रहा. घरातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते. त्याकरता धावपळ होईल. तुमच्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखावू शकते. जमिनीच्या व्यवहारात यशप्राप्ती होईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीमध्ये समाधान प्राप्त होईल. एखादे अवघड काम करून दाखवाल. वैवाहिक सुख उत्तम प्राप्त होईल. जोडीदारामुळे फायदा होऊ शकतो.
उपाय ः शंकराला जलाभिषेक घालावा.
धनु
तब्येतीला सांभाळा. व्हायरल इन्फेक्शन किंवा पोटासंबंधी तक्रार येऊ शकते. पैशांची आवक चांगली असेल. भावंडांची साथ मिळून एखादे अवघड काम पूर्ण होईल. नोकरीत पगारवाढ किंवा प्रमोशनचे योग होत आहेत. प्रेमसंबंधात वाढ होईल. गुंतवणूक करण्याकरता योग्य वेळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे प्रसंग येऊ शकतात. भाग्याची उत्तम साथ आहे. धार्मिक रहावे.
उपाय ः पिवळा हातरुमाल जवळ ठेवावा.
मकर
आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. कुटुंबाची साथ मिळेल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. प्रवासाचे योग आहेत. मनाची इच्छा पूर्ण होईल. प्रेमसंबंधांमध्ये मनासारख्या घटना घडतील. गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. करमणुकीकडे आणि आराम करण्याकडे कल असेल. नोकरीत समाधानी असाल. वैवाहिक सुख चांगले असेल. सगळय़ा प्रकारच्या लाभाची शक्मयता आहे.
उपाय ः अन्नदान करावे
कुंभ
गेल्या काही दिवसापासून तब्येतीची तक्रार होती ती हळुहळू कमी होण्याची शक्मयता आहे. धनप्राप्तीचे मार्ग सापडतील. परिवारातील व्यक्ती तुमची साथ देतील. जमिनीच्या व्यवहारात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्मयता आहे. सुख प्राप्त होईल. संततीकडून चांगली बातमी कळू शकते. नोकरीत जास्त कष्ट करण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक सुख ठीकठाक असेल. उपाय ः शुक्रवारी दाम्पत्य भोजन घालावे.
मीन
तुम्ही कामे करता पण योग्य मोबदला मिळत नाही अशी तक्रार पूर्वी होती ती आता कमी होईल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. तब्येत ठीकठाक असेल. कुटुंबीयांची साथ मिळेल. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. प्रवास घडल्यास त्यातून फायदा होईल. नोकरीमध्ये वरि÷ तुमच्यावर खुश असतील. वैवाहिक जीवनात मात्र मतभेदांना सामोरे जावे लागेल. लवकरच भाग्योदयाचे योग आहेत.
उपाय ः खडीसाखर खाऊन कामाला जावे.