रत्नागिरी : प्रतिनिधी
गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या खासगी बसेसची तपासणी नियमितपणे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून महामार्गावर सुरू आहे . तसेच मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई होत आहे . दोन दिवसात १८ खासगी बसेसवर कारवाई करून १ लाख ३० हजारांचा दंड करण्यात आला.
नियमबाह्य काही गोष्टी आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली . गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मुंबई , पुण्यातून नागरिक दाखल झाले आहेत . जिल्ह्यात गणेशोत्सव काळात खासगी बसधारकांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या . त्याअनुषंगाने महामार्गावर तपासणी करून कारवाई करण्यात आली.