शहर वार्ताहर/राजापूर
विद्यार्थ्याना देण्यात येणारे गणवेश अनुदानाची रक्कम संबधित शाळांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. मात्र नव्याने राबवण्यात येणाऱ्या पीएफएमस प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटीमुळे ते विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत. यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यावर्षी ही अनुदानाची रक्कम संबधित शाळांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. मात्र प्रथमच मात्र नव्याने राबवण्यात येणाऱ्या पीएफएमस प्रणाली मध्ये ती अनुदानाची रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये शाळेकडून जमा करण्यात आलेली नाही. याबाबत काही पालकांची शाळेशी संपर्क साधला असताना नव्याने राबवण्यात येणाऱ्या पीएफएमस प्रणाली मध्ये अनेक त्रुटी असल्याने संबधित विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात अडचण ठरली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबधित विभागाकडे ही बाब निदर्शनास आणून दिली असल्याचे सांगण्यात आले. तरी संबधित विभागाने नव्याने राबवण्यात येणाऱ्या पीएफएमस पणालीमधील असलेल्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी पालगवर्गामधून करण्यात येत आहे.