लांजा : प्रतिनिधी
लांजा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांच्यावर दहाजणांच्या शिवसेना- शिंदे गट गटाने अविश्वास ठराव दाखल केला होता. यावर आज सोमवारी 17 एप्रिल रोजी मतदान झाले. उद्धव ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्ष पुर्वा मुळे यांच्या विरोधात यांनी हा ठराव हरला असून त्यांच्याविरोधात 13 विरुद्ध 0 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला.
अविश्वास ठराव मंजूर होताच उद्धव ठाकरे सेना आक्रमक झालेले दिसून आले. लांजा नगरपंचायतीच्या खाली शिवसेनेचा मोठा जमाव जमला होता. यावेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्या विरोधात उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पूर्वा मुळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने आमदार राजन साळवींना हा मोठा धक्का मानला जात आहे.
लांजा नगर पंचायतच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांच्यावर शिंदे गटाच्या नगरसेवकांकडून अविश्वास ठराव मांडला होता. नगराध्यक्षांसह शहर विकास आघाडीतील १४ नगरसेवकांना गटनेता म्हणुन पुर्वा मुळे यांनी व्हिप बजावला होता. मात्र शिंदे गटाचे पाच नगरसेवक, कॉंग्रेसचे दोन, अपक्ष दोन आणि भाजपचे तीन नगरसेवक असे १२ नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी पूर्वा मुळे यांच्या विरोधात मतदान केले.