9 ऑगस्ट 2019 रोजी घडलेली खळबळजनक घटना; सुमारे वर्षभराने आरोपीला झाली होती अटक
रत्नागिरी प्रतिनिधी
शहरानजीकच्या खेडशी-गवाणकरवाडी येथील 16 वर्षीय मैथिली गवाणकर हिचा खून ऑगस्ट 2019 मध्ये घडला होता. जंगलात खून झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या खूनपकरणी संशयित आरोपीही सुमारे 1 वर्षांनतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. या खून खटल्याची अंतिम सुनावणी येथील सत्र न्यायालयात होवून आरोपी नीलेश उर्फ अक्कू प्रभाकर नागवेकर (36) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
खेडशी गवाणकरवाडी येथे राहणारी मैथिली पवीण गवाणकर ही लोकवस्तीपासून काही अंतरावर जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. सायंकाळी ती घरी परतली नव्हती. तिची रात्री उशिरापर्यंत कुटुंबिय व गावातील शेजाऱ्यांनी शोधाशोध घेतल्यानंतर त्या जंगलातील किर्रर्र काळोखात मृतदेह आढळल्याने साऱ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली. डोक्यावर दगड घालून त्या युवतीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. ही घटना शुकवारी 9 आगस्ट 2019 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली होती.
मैथिली ही अकरावीत शिक्षण घेत होती. महाविद्यालयातून आल्यानंतर ती नेहमे घरच्या शेळ्या चारण्यासाठी दुपारी वाडीपासून काही अंतरावर जंगलात जात असे. नेहमीपमाणे शेळ्यांना चारण्यासाठी गेलेली असताना ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी पतरली नसल्याने कुटुंबियांसह साऱया गाववाल्यानी तिची शोधाशोध सुरू केली. तिचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थ त्या जंगलाकडे रवाना झाले. मैथिली शेळ्या चारण्यासाठी गेली असताना तिच्याकडे मोबाईलही होता. त्यामुळे त्या मोबाईलचे लोकेशनही खेडशी परिसरातील जंगलाकडे दाखवले जात होते. मोबाईलच्या लोकेशनवरून आजूबाजूच्या परिसरातही रहिवाशांमध्ये तिची रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू असतानाच एका झुडपाशेजारी कोपऱयात मैथिली ही निपचित पडलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसली. तिला पाहून साऱयांनाच धक्का बसला. जवळ जाऊन पाहिले असता तिच्या डोक्यावर जबर जखम पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यावेळी तिचा मोबाईलही त्या परिसरात एका बाजूला पडलेल्या अवस्थेत सापडला. तिच्यावर कुणी जंगली पाण्याने हल्ला केला तर नाही ना? असा पश्न सुरूवातीला ग्रामस्थांना पडला. बिबट्याने हल्ला केल्याचीही चर्चा त्यावेळी झाली. पण डोक्यावरील गंभीर जखम पाहून हा वेगळाच पकार असल्याचे तर्पवितर्प सुरू झाले. या घटनेची खबर ग्रामस्थांनी तत्काळ ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनीही या पकाराची खबर मिळताच तातडीने खेडशीकडे रवाना होऊन तपासकार्य हाती घेतले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करताच तिला मारून टाकण्यात आल्याचा अंदाज पाथमिक दर्शनी वर्तवला. मैथिलाचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
या पकरणी ग्रामस्थांशी सर्व बाजूने तपास केल्यानंतर ग्रामीण पोलिसांकडे घटनेची नोंद केली. तिचे वडील पवीण सीताराम गवाणकर यांनी त्या बाबत तकारही दिली. त्यावरून अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार घटनास्थळाची तसेच त्या परिसराची सर्व बाजूने पडताळणी करण्यात आली. मोबाईल कॉल रेकॉर्डही तिचे तपासण्यात आले. त्यावरून तिच्या मोबाईलवर शेवटचा कॉल असलेल्या मित्राचीही चौकशी करण्यात आली होती. जवळच्या नातेवाईकांचीही कसून चौकशी झाली होती. तरीही धागेदोरे हाती लागत नसल्याने गावात सातत्याने पोलिसांचा वावर राहिला होता. त्यामुळे तेथील ग्रामस्थही दडपणाखाली राहिले होते. तपासादरम्यान श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मैथिलीच्या अंत्ययात्रेवेळी हे श्वानपथक संशयित आरोपीचा माग घेत अंत्ययात्रेत घुसले होते. त्यावेळी संशयितही त्या अंत्ययात्रेत होता, पण येथील गर्दी पाहून श्वानपथकाने त्या ठिकाणहून मागे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर येता-येता निसटला होता.
ज्या घटनास्थळी मैथिलीचा खून करण्यात आला, तेथील धागेदोरे शोधण्याचे काम कसून करण्यात आले. मैथिलीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती. तिच्या डोक्यात दगड किंवा अन्य साधनाचा वापर केल्याचा दाट संशय होता. या तपासादरम्यान झालेल्या अंतिम तपासात संशयित आरोपी सुमारे वर्षभराने पोलिसांच्या रडारवर आला व त्याला अटक करण्यात आली. त्या दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी नीलेश उर्प अक्कू नागवेकर हा मैथिली बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या जंगल परिसरात गेला होता. त्याने मैथिलीच्या बकऱ्यांच्या कळपातील 1 कोकरू उचलून घेतले होते. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला व यातूनच मैथिलीचा खून केल्याचा आरोप नीलेश नागवेकरवर पोलिसांकडून ठेवण्यात आला होता. या खून पकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता. सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयासमोर अंतिम सुनावणी झाली. खूनाचा आरोप असलेल्या नीलेश नागवेकर याची खूनाच्या आरोपातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.