व्हिटीएस पणाली बसवण्याचा होता प्रस्ताव
प्रतिनिधी/रत्नागिरी
राज्य परिवहन महामंडळ (एसटी) यांच्याकडून प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसचे लाईव्ह लोकेशन ॲप सुरू करणार अशी घोषणा करण्यात आली होत़ी त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात देखील एसटी बसचे लाईव्ह लोकेशन पहावयाला मिळणार असे सांगण्यात आले होत़े यासाठी व्हिटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम)
तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार होत़ा. मात्र घोषणेच्या 3 वर्षानंतर हे ॲप सुरू झाले नसून घोषणा केवळ कागदावरच असल्याची माहिती समोर आली आह़े.
एसटी बसचे लोकेशन आता घरबसल्या पाहता येणार अशी घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली होत़ी आपल्याला हवी ती बस आता नेमकी कोणत्या ठिकाणी आहे. यांची माहिती करून देण्याचा उद्देश हे ॲप सुरू करण्यामागे होत़ा त्यासाठी ॲप देखील लाँच करण्यात आले हेत़े 15 ऑगस्ट 2020 पासून पवाशांसाठी हे ॲप
कार्यान्वित होईल असे सांगण्यात आले हेत़े प्रत्यक्षात अद्यापही हे ॲप सुरू झालेले नाह़ी. त्यामुळे एसटी बसची ताटकळत वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय प्रवाशांच्या जवळ राहिलेला नाह़ी.
हे ही वाचा : बंडखोर आमदार समर्थकांची रत्नागिरी युवासेनेतून उचलबांगडी
रत्नागिरी जिल्ह्यात विभागिय कार्यालयाअंतर्गत एकूण 9 आगार आहेत़ यामध्ये मंगडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, देवरूख, रत्नागिरी, लांजा व राजापूर येथील बसस्थानकांवर एलसीडी स्कीन लावण्यात येणार होत़ी यामुळे प्रवासी तसेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना देखील दैनंदिन कामात याचा चांगला उपयोग होणार होत़ा. मागील दोन वर्षात कोरोनामुळे एसटी बसच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्य़ा. त्याचपमाणे कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या संपामुळे बसफेऱ्यावर परिणाम झाला होत़ा आता एसटी बस पूर्ण क्षमतेने पवासी वाहतूक
करत असल्याने हेॲप सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होत़ी. व्हिटीएस तंत्रज्ञानाच्या या ॲपनुसार बस गाड्यांचे लाईव्ह लोकेशन, चालक वाहक यांची नावे आदी माहिती उपलब्ध होणार होत़ी सध्या या प्रणाली अंतर्गत पुण्यातील स्वारगेट, पुणे स्टेशन, यासह राज्यातील 13 बसस्थानकांवर ही प्रणाली राबवण्यात येत आह़े त्याचा मोठा फायदा प्रवाशांना होत आह़े. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात देखील अशा प्रकारची सेवा सुरू करावी , अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आह़े.
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भाग अधीक प्रमाणात आहेत़ यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी यांच्यासाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरणार आह़े. अनेक वेळा बस स्टॉपवर ताटकळत उभ राहण्याची वेळ प्रवाशांवर येत असत़े एसटीचे रूप बदलत असताना अशा प्रकारच्या सेवा उपलब्ध झाल्यास खऱ्या अर्थाने एसटी
आधुनिकतेकडे वाटचाल करेल असे बोलले जात होत़े मात्र अद्याप या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नसल्याने आणखी काही काळ प्रवाशांना ॲपची वाट पहावी लागणार आह़े.
लाईव्ह लोकेशन ॲपबाबत माहिती घेणार
लाईव्ह लोकेशन ॲप सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून सांगण्यात आले होत़े. व्हिटीएस प्रणालीवर आधारित लाईव्ह लोकेशन ॲप रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप सुरू झालेले नाह़ी हे ॲप कार्यान्वित करण्याबाबत आपण अधीक माहिती घेणार आह़े. प्रज्ञेश बोरसे – (विभागिय वाहतूक नियंत्रक रत्नागिरी)
हे ही वाचा : Ratnagiri : डोंगर खचण्याच्या प्रकाराने वाढली मंडणगडची चिंता