गुडघ्याच्या दुखापतीचा फटका, अक्षर पटेलचा संघात समावेश
दुबई / वृत्तसंस्था
अष्टपैलू रविंद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित आशिया चषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असून त्याच्याऐवजी अक्षर पटेलचा पर्यायी खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. जडेजाने यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध विजयात 29 चेंडूत 35 धावांचे मोलाचे योगदान दिले होते.
सौराष्ट्राच्या या दिग्गज डावखुऱया खेळाडूने हाँगकाँगविरुद्ध फलंदाजी केली नाही. मात्र, गोलंदाजीत त्याने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना केवळ 15 धावा दिल्या. पर्यायी खेळाडू अक्षर पटेलने अलीकडेच झिम्बाब्वेत वनडे क्रिकेट खेळले असून लवकरच तो भारतीय पथकात दाखल होईल.