प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Education News : येथील कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये नवीन बीसीए अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. 2023-2024 या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी दिली.
बीसीए अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता मिळविलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासंदर्भात कॉलेजमधील संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले आहे. बीसीए अभ्यासक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य अॅड. अमित बाडकर, अॅड. वैभव पेडणेकर, प्रचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांचा पुढाकार, पाठपुरावा महत्वाचा ठरला.