अग्निवीरद्वारे होणार भरती
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्यावतीने युनिट हेडक्वॉर्टर कोटाअंतर्गत 19 सप्टेंबरपासून बेळगावमध्ये अग्निवीर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. याद्वारे जनरल डय़ुटी, टेडमन, क्लार्क, स्टोअर कीपर व टेक्निकल या पदांसाठी 19 ते 26 सप्टेंबर दरम्यान कॅम्प येथील शिवाजी स्टेडियमवर ही भरती होणार आहे.
19 सप्टेंबर रोजी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी जीडी पदासाठी भरती होणार आहे. 20 रोजी अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर व मुंबई या जिल्हय़ांमधील उमेदवारांसाठी जीडी पदासाठी भरती होणार आहे.
21 रोजी नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, धाराशीव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम व यवतमाळ या जिल्हय़ांमधील उमेदवारांसाठी जीडी पदासाठी भरती होईल. 22 रोजी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवासाठी जीडी पदासाठी भरती होईल. 23 रोजी कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील उमेदवारांची जीडी पदासाठी भरती होणार आहे. 24 रोजी टेड्समन पदासाठी भरती होईल. 26 रोजी क्लार्क, स्टोअर किपर व टेक्निकल पदांसाठी भरती होणार आहे.
जीडी, टेडमन, क्लार्क व स्टोअर कीपर पदांसाठी 17 वर्षे 6 महिने ते 23 वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे. भरतीसाठी येणाऱया उमेदवाराकडे कोविड लस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर संपर्काचे आवाहन केले आहे.