दोडामार्ग / वार्ताहर-
तिलारी खोऱ्यातील रानटी हत्तींना घालविण्यासाठी नेमण्यात आलेल्या हाकारींची मजुरी संदर्भातील माहिती देण्यास वनविभागाकडून टाळाटाळ करण्यात येत असून या संदर्भात चौकशीची मागणी केर येथील पंकज तुकाराम देसाई यांनी केली आहे. सन 2015 ते 2022 पर्यन्तच्या हत्ती हाकारिंची मजुरीची व पेयमेंटची माहिती वनविभागाकडे मागण्यात आली होती परंतु ती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे पंकज देसाई यांनी सांगीतले.