सावंतवाडी / प्रतिनिधी
मांगेली गावातील एसटी बसेस अनियमित सुरू असल्यामुळे तेथील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे .एसटी अधिकाऱ्यानी मांगेली गावच्या बसेस योग्य वेळेत पोहोचतील याबाबत जातीने लक्ष घालावे. मांगेली हे गाव अति दुर्गम असून दोडामार्ग तालुक्यामध्ये येते तेथे गेल्याशिवाय तिथल्या लोकांच्या वेदना अधिकाऱ्यांना समजणार नाही. तरी मांगेली बसेस नियमित वेळेत गावात जातील याची दखल वेळीच एसटी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी घ्यावी मनसेच्या आंदोलनास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचाही पाठिंबा आहे .
मांगेली हे अतिदुर्गम गाव. या गावात एसटी अनियमित सुरू आहे मनसे दोडामार्ग यानी याबाबत आंदोलने पुकारलेले आहे .त्याला आपला पाठिंबा असल्याचे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी स्पष्ट केले आहे