ओटवणे / प्रतिनिधी
सावंतवाडीत बुधवारी मध्यरात्रीची घटना
गोव्यातील पर्यटकांच्या ओमनी चालकाने ओटवणे येथील क्वालीस चालकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री सावंतवाडीत सावंतवाडी बाहेरचावाडा येथील पेट्रोल पंपा नजिक घडली.ओटवणे येथील क्वालीस चालकाचे नाव बाबाजी अनंत तारी असून ओमनी चालकाने क्वालीसला धडक देऊनही उलट मारहाण केल्यामुळे बाबाजी तारी यांनी सावंतवाडी पोलिसात धाव घेतली आहे.
बाबाजी तारी मालवणवरून ओटवणे येथे येत असताना गोव्यातील पर्यटकांची ओमनीची त्यांच्या क्वालीसला धडक बसली. त्यामुळे बाबाजी तारी क्वालीस चालकाला विचारायला गेले असता उलट क्वालीस चालकाने बाबाजी तारी यांना मारहाण करून गोव्याला पसार झाले.
या घटनेबाबत बाबाजी तारी यांनी सावंतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली असुन सावंतवाडी पोलिस अधिक तपास पोलीस करीत आहेत.