नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जे करदाते देशाबाहेर करभरणा करतात, त्यांना प्राप्तीकर विभागाने महत्वाचा दिलासा दिला आहे. या करांवरील पेडिट मागण्यासाठी अधिक कालावधी देण्यात आला आहे. प्राप्तीकर विवरणपत्र निर्धारित वेळेत सादर केल्यास असे करदाते या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत पेडिटची मागणी करु शकतात असे स्पष्ट करण्यात आले आहे. करदात्यांकडून ही कालावधीवाढ मागण्यात आली होती.
आतापर्यंतच्या नियमानुसार विदेशी कर क्रेडिटची मागणी, प्राप्तीकर विवरणपत्र अर्ज क्रमांक 67 सर्व आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित वेळेत सादर केल्यासच करता येत होती. यामुळे क्रेडिटची मागणी करण्यावर मर्यादा येत होत्या. मात्र, आता या नियमात सूट दिली गेल्याने करदात्यांचा काही प्रमाणात लाभ होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नियमांमध्ये हे आवश्यक परिवर्तन केले आहे.
ट्विटद्वारे माहिती
प्रत्यक्ष कर विभागाने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. करदात्यांनी त्यांचे विवरणपत्र निर्धारित वेळेपूर्वी सादर करावे. तसे केल्यास क्रेडिटची मागणी त्यांना या आर्थिक वर्षाच्या अखेरपूर्वी पर्यंत करता येईल. यामुळे भारतात व्यवसाय करणे अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे, असे तज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारने विदेशी गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात आकर्षित करण्यासाठी व्यवसायसुलभतेचे धोरण गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने अवलंबिलेले आहे.