वृत्तसंस्था/ बार्सिलोना (स्पेन)
स्पेनचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू तसेच बलाढय़ बार्सिलोना संघातील बचावफळीत खेळणारा गेरार्ड पिकने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. शनिवारी कॅम्प नोयु येथे होणाऱया बार्सिलोना क्लबच्या शेवटच्या सामन्यात तो खेळणार आहे.
कॅम्प नोयु येथे बार्सिलोना आणि ला-लीगा स्पर्धेतील अल्मेरिया यांच्यात हा सामना खेळविला जाणार आहे. पिकने आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर बार्सिलोना संघाला आठवेळा ला-लीगा फुटबॉल स्पर्धेचे तसेच तीनवेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळवून दिले. 2010 साली पिकने स्पेनला फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकून दिली होती. तसेच स्पेनला 2012 साली युरोपियन चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपदही मिळवून दिले होते. पिकने स्पेनचे तब्बल नऊ वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. रशियामध्ये 2018 साली झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेपूर्वी पिकने आपला निवृत्तीचा निर्णय घेतला होता. 1997 साली पिक बार्सिलोना संघामध्ये दाखल झाला. त्यानंतर 2004 साली त्याने मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये प्रवेश केला होता.