आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे प्रतिपादन : दोन माड केरी शिवजयंती उत्सव,आमदार डॉ देविया राणे यांचा सत्कार
वाळपई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळेच समाजाला योग्य दिशा प्राप्त झालेली आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाला ऊर्जाप्रेरित संस्कार प्राप्त होत असतात .त्यांच्या कार्याचे अनुकरण केल्यास प्रत्येकाचे जीवन सफल होणार आहे. यामुळे त्यांच्या कार्याची दखल सामाजिक स्तरावर सामाजिक संस्थांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली आदर्शवत प्रतिमा निर्माण केली. यामुळे येण्राया हजारो वर्षांपर्यंत त्यांची कार्याची आठवण चिरंतनकाल टिकून राहणार असल्याचे प्रतिपादन व राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. दोनमाड केरी बाजार समितीने आयोजित केलेले शिवजयंती उत्सव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. देविया राणे यांचा शिवजयंती उत्सव समितीतर्फे तलवार व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केरी जिल्हा पंचायत सभासद देवयानी गावस, होंडा जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, केरी सरपंच दीक्षा गावस, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, केरी उपसरपंच भिवा गावस, दोनमाड बाजार समितीचे अध्यक्ष गणेश गावस, केरी पंचायतसदस्य नंदिनी गावस, संदीप ताटे तनवीर पांगम, राजेश गावस श्रीपाद गावस ,उस्मान सय्यद ,सुप्रिया विष्णू गावस व प्रमुख वत्ते म्हणून पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त प्राध्यापक डॉ. अऊण बाबुराव घोडके यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, स्थानिक आमदार डॉ. देविया राणे या चांगल्या नेत्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकाशी मिसळून त्यांचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी त्यांना सहकार्य केल्यास या मतदारसंघांमध्ये येणाऱ्या काळात आधुनिक स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
सत्कारामुळे जबाबदारी वाढली : डॉ. देविया राणे
यावेळी बोलताना स्थानिक आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले की केरी पंचायत क्षेत्रामध्ये वारंवारपणे येण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते. या भागांमध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आयोजित होत असतात. यामुळे या गावांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झालेली आहे. आपले सासरे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून अनेक पायाभूत साधन सुविधा उपलब्ध झाल्या. आता पुढील विकासाची जबाबदारी आपल्यावर आहे .यामध्ये अजिबात कमी पडणार नसल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रलंबित असलेल्या सर्व समस्या येण्राया काळात सोडविण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न करण्यात येतील. प्रमुख वत्ते म्हणून बोलताना प्राध्यापक अऊण घोडके यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे प्रत्येकासाठी प्रेरणा देणारे आहे. अनेक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासंदर्भात गैर माहिती प्रसिद्ध केली जाते. यामुळे आजही समाजामध्ये त्यांच्या कार्यासंदर्भात संभ्रमित अवस्था निर्माण झालेली आहे. हे मोठे दुर्दैव आहे. ज्या देशाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यामुळे आदर्श प्राप्त झाला त्या राजाची विचारधारा आज समाजामध्ये पसरणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा प्रत्येकाचे जीवन हे अर्थहीन होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केलेली आहे. त्यांचे जीवन निश्चितच गौरवशाली बनणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. तऊणांपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य उभे राहणे अत्यंत गरजेचे असून त्या दृष्टिकोनातून शिवजयंती उत्सव समितीने कार्यरत राहावे अशी विनंती यावेळी त्यांनी केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक गणेश गावस यांनी केले.
शिवजयंती उत्सव समितीच्या पार्श्वभूमीवर केरी सरकारी हायस्कूल ते दोन माड केरी दरम्यान ढोल ताशांची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भागा घेतला होता. सकाळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश वामन गावस यांनी यजमानपद स्वीकारले .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालक चंद्रकांत रामा परब यांनी केले तर शेवटी नूतन पार्सेकर यांनी आभार व्यक्त केले. आमदार डॉ. दिव्या राणे यांचा शाल तलवार व शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला .यावेळी त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. मानपत्राचे वाचन चंद्रकांत परब यांनी केले. गणेश शेट्टर यांनी मानपत्राचे लिखाण केले होते. यावेळी छायाचित्रकार गणेश शेटकर यांचा आयोजन समितीच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. केरी पंचायतीचे अनुभवी पंचायत सभासद उस्मान सय्यद यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.