सावंतवाडी : प्रतिनिधी
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या कडून 50 लाखाहुन अधिकची रस्त्याची कामे मंजूर झाली आहेत.शिवसेना उपतालुका प्रमुख मंगलदास देसाई ,माजी सरपंच वैदही देसाई ,माजी सोसायटी चेअरमन सुनिल देसाई, शाखा प्रमुख सिताराम देसाई, अनिल देसाई, योगेश मांजरेकर ,माजी सरपंच विवेक केसरकर ,ग्रामपंचायत सदस्य गौरवी देसाई, रुपाली देसाई, शिवसेना उपविभाग प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई, यांच्या खास प्रयत्नाने रस्ते मंजूर झाले आहेत. (1)डेगवे हरीजनवाडी ते श्रीधर देसाई यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता 5 लाख रुपये (2)डेगवे आंबेखण दलित वस्तीते ई.जी.मा 63 ला जोडणारा रस्ता 20 लाख रुपये (3)डेगवे आंबेखणवाडी ते प्रकाश देसाई यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता 7 लाख रुपये (4)डेगवे आंबेखण भोमभरड रस्ता 8 लाख रुपये (5) डेगवे मिरेखणवाडी रस्ता 10 लाख रुपये (6) डेगवे मिरेखणवाडीचा 1 किलोमीटरचा रस्ता 7 लाख रुपये (7)डेगवे मोयझरवाडी येथील होळीचा खुंट ते तांबोळी रस्ता 7 लाख रुपये ही कामे मंजूर आहेत. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक
केसरकर यांची डेगवे गावाबद्दल असणारी आपुलकी व जिव्हाळा दिसुन येतो असे मत व्यक्त केले