सातारा प्रतिनिधी
उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरी घरफोडी वाहनांची जाळपोळ करणाऱ्या तिन्ही सामाना तडीपार घोषित करण्यात आलेला आहे.
प्रतिबंधक कारवाई करूनही टोळीचा आपल्या हालचालीस प्रतिबंध झालेला नव्हता. त्यांच्या रोज्या गुन्ह्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान होत होते. त्यांना हद्दपार या कायद्याच्या धाक नसून ते बेकायदेशीर कारवाया करीत आहेत. त्यांना सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्य़ा वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची जनतेतून मागणी होत होती. शाहीद उर्फ सोन्या शब्द मुल्ला (वय 28 वर्ष) शाहरुख शब्बीर मुल्ला (29 वर्षे) अमित अंकुश यादव (वय 36 वर्षे) यांना तडीपार करण्याचे आदेश आलेले आहे. या प्रस्तावाची चौकशी कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्रीरामजीत पाटील यांनी केला होता.