वृत्तसंस्था/ कोलंबो
भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात एक मोठे रेकॉर्ड आपल्या नावे केले आहे. या प्रकारात सर्वा त जलदरित्या 5000 धावा पूर्ण करणारी ही जोडी हिट ठरली आहे. मंगळवारी कोलंबो येथील स्टेडियममध्ये आशिया कप सुपर 4 मध्ये झालेल्या श्रीलंका विरोधातील सामन्यात या भारतीय जोडीने ही कामगिरी केली. नॉन ओपनिंगमध्ये खेळणाऱ्या या जोडीने वन डे प्रकारात सर्वात जास्त जलदगतीने 5000 हजार धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनीज व डेसमंड हेन्स या 97 सामन्यातील जोडीचा विक्रम रोहित-विराटने 86 एकदिवसीय सामन्यातून मोडित काढला. दोघांनी 18 वेळा शतक व 15 अर्धशतकी खेळी भागिदारीत केली आहे.
या हिट जोडीने 2018 मध्ये गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात 323 लक्ष्य गाठताना 246 धावांची अविस्मरणीय भागीदारी केली. ही जोडी 5000 या विक्रमी ऐतिहासिक आकडेवारीपर्यंत पोहोचणारी तीसरी भारतीय जोडी आहे. यापूर्वी सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली तसेच स्वत: रोहित शर्मा आणि शिखर धवणच्या जोडीने हा विक्रम केला आहे. तेंडूलकर-गांगुलीच्या नावे 176 सामन्यातून 8227 धावांचे एकदिवसीय सामन्यातील जागतिक रेकॉर्ड आहे.