कोलकाता
आरामदायी मोटारसायकलच्या शेणीतल दुचाकी सादर करणारी कंपनी रॉयल इनफिल्डच्या हंटर 350 या मोटारसायकलने विक्रीत दमदार कामगिरी करत दुसरे स्थान राखले असल्याची माहिती आहे. परवडणारी लोकप्रिय दुचाकी म्हणून 1.49 लाख रुपये किंमत असलेल्या हंटर 350 दुचाकीचा उल्लेख होतो. ऑगस्टमध्ये लाँच केल्याच्या महिन्याभरातच 18 हजार 993 हंटरची विक्री करण्यात कंपनीला यश आले आहे.