मुंबई
संरक्षण क्षेत्रातील व त्याशी संबंधीत कंपन्यांचे समभाग शुक्रवारी शेअर बाजारात चमकताना दिसले. समभाग जवळपास 10 टक्के इतके वाढले होते. मिश्र धातू निगम (मिधानी), माझगाव डॉक शिपबिल्डर्स, कोचीन शिपयार्ड, गार्डन रिच शिपबिल्डर्स व भारत डायनॅमिक्स यांचे समभाग शुक्रवारी बीएसईवर 5 ते 10 टक्के इतके वाढले होते. मिधानी 10 टक्केसह 223 रुपयांवर तर माझगावचा समभाग 9 टक्केसह 457 रुपयांवर पोहचला होता.