वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या स्टॉकहोम खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत डेन्मार्कचा 19 वषीय युवा टेनिसपटू होल्गेर रुनेने ग्रीसच्या स्टिफॅनोस सित्सिपेसचा पराभव करत अजिंक्मयपद पटकाविले.
डेन्मार्कच्या 19 वषीय रुनेने सित्सिपेसचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. एटीपीच्या क्रमवारीत रुने 27 व्या स्थानावर आहे. या अंतिम सामन्यात रुनेने दोन्ही सेट्समध्ये सित्सिपेसची सर्व्हिस किमान चारवेळा भेदली. या सामन्यात त्याने 20 विनर्स फटके मारले.