ओटवणे प्रतिनिधी
संघटनेच्या मुंबईतील बैठकीत कार्यकारणीची एकमताने निवड
Rupesh Parab as President of Vilawade Panchkroshi Alumni Association
विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या विलवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी रुपेश परशुराम परब यांची निवड करण्यात आली. मुंबईत दादर मधील शारदाश्रम विद्यामंदिर येथे झालेल्या या हायस्कूलच्या विलवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघटनेच्या बैठकीत या नवनिर्वाचित कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली.विलवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारणी निवड पुढीलप्रमाणे अध्यक्ष – रुपेश परशुराम परब ( भालावल), सेक्रेटरी – सौ. अंजली सावंत -दळवी ( विलवडे), खजिनदार – सुभाष परब (विलवडे), उपाध्यक्ष – परेश धर्णे (विलवडे), सहसचिव – संजय गावडे ( सरमळे), कार्यकारणी सदस्य राजेश तांबे (विलवडे), लक्ष्मीकांत सावंत ( विलवडे), सौ.जयश्री दळवी- सुपल (विलवडे), जनार्दन गावडे (भालावल), सचिन चंदकांत सावंत ( मिरेखण – डेगवे), सत्यवान राणे- कोनस्कर (कोनशी), प्रभाकर दळवी (विलवडे), जिवन दळवी (विलवडे), किरण दळवी ( विलवडे), सल्लागार- सुर्यकांत दळवी, गोपाळ दळवी
राजा शिवाजी विद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी गेल्या ५ वर्षांपासून हायस्कूलमध्ये शैक्षणिक सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. या हायस्कूलमध्ये तांबोळी, कोनशी, भालावल, सरमळे, विलवडे, वाफोली गावातील विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी या संघटनेच्यावतीने गेल्यावर्षी वाहन देण्यात आले. तसेच नुकताच हायस्कूलमधील कार्यालयीन कामकाजासाठी लॅपटॉप देण्यात आला. त्यामुळे या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही संघटना विविध उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष रुपेश परब यांनी सांगितले. तर लवकरच स्थानिक पातळीवर विभाग संघटक प्रमुख म्हणून पदाधिकारी जाहिर करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित सेक्रेटरी सौ. अंजली सावंत-दळवी यांनी सांगितले
या बैठकीला मुंबई परिसरातील सुर्यकांत दळवी, गोपाळ दळवी, हेमंत सावंत, देऊ दळवी, धोंडी दळवी, रोहीदास दळवी, राजन कानडे, सचिन परब, समिर गावडे, पौर्णिमा दळवी- प्रभु, कृष्णकला दळवी, रश्मी ( वृंदा) देसाई आदी उपस्थित होते