युपेन हल्ल्याला विरोध केल्यामुळे सध्या नजरकैदेत
मॉस्को / वृत्तसंस्था
रशियाने 19 वर्षीय तरुणीला दहशतवादी घोषित करून तिचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. एवढेच नाही तर तिला तुरुंगवास भोगावा लागला आहे. युपेन हल्ल्याला विरोध केल्यामुळेच रशियाने सदर तरुणीला शिक्षा दिली आहे. ओलेसिया क्रिव्हत्सोवा असे शिक्षा झालेल्या मुलीचे नाव आहे. ती तिच्या आईसोबत रशियातील अर्खांगेल्स्क शहरात राहत होती. रशिया संबंधित तरुणीला आयएस, अल-कायदा आणि तालिबानइतकेच धोकादायक मानतो.
8 ऑक्टोबर रोजी रशियावर ओलेसिया हिने सोशल मीडियावर काही पोस्ट टाकल्या होत्या. याच दिवशी युपेनने रशियाचा केर्च पूल उडवून दिला होता. आपल्या पोस्टमध्ये तिने युपेनवरील रशियन हल्ल्याला विरोध केला होता. तसेच तिच्यावर लष्कराचा अपमान केल्याचाही आरोप आहे. तेव्हापासून तिला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ताब्यात घेण्याबरोबरच तिच्या पायाला ट्रकर बसवण्यात आला आहे. याद्वारे रशियन अधिकारी तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. नजरकैदेत ठेवल्यानंतर ओलेसियाने आपल्या पायावर टॅटू गोंदवल्याचे दिसून आले असून त्यात पुतिनविरोधी दृश्य दिसून येत आहे.