नवी दिल्ली:
भारतीय तटरक्षक दलाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात अतिरिक्त महासंचालकपदी एस. परमेश यांना तैनात करण्यात आले आहे. परमेश हे यापूर्वी विशाखापट्टणम येथे तटरक्षक कमांडर म्हणून तैनात होते. नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्ली आणि डिफेन्स सर्व्हिसेस कॉलेज, वेलिंग्टनचे कॅडेट राहिलेले परमेश यांच्या नावावर अनेक कामगिरींची नेंद आहे. परमेश यांनी मागील तीन दशकांमध्ये किनारा अन् सागरी क्षेत्रांमधील तैनातीद्वारे विविध क्षमतांमध्ये संघटनेची सेवा केली आहे. फ्लॅग ऑफिसर परमेश हे नेव्हिगेशन आणि डायरेक्शनमध्ये तज्ञ आहेत. त्यांच्या सागरी कमांडमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे सर्व प्रमुख जहाजं सामील आहेत, ज्यात अॅडव्हान्स ऑफशोर पेट्रोल वेसल समर आणि ऑफशोर पेट्रोल वेसल विश्वस्त सामील असल्याचे तटरक्षक दलाच्या वेबसाइटवर नमूद आहे. परमेश यांना तटरक्षक दलात विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींकडून तटरक्षक दल पदक प्राप्त झाले आहे.