गडहिंग्लज :
कोल्हापूर सहकारी मध्यवर्ती बॅंकेच्या नांगनूर गडहिंग्लज शाखेवर मोठी चोरी झाल्याची बातमी येत असून यामध्ये चोरट्यांनी रात्रीत धुमाकुळ घालुन एकाच गावात, एकाच ठिकाणी तीन चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये केडीसीसी बॅंकेतून मोठी रक्कम चोरीला गेली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
गडहिंग्लज तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या नांगनूर येथील हिरण्यकेशी दूध संस्थेच्या इमारतीत असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेसह लगतच्या पोस्ट, वीज वितरण कार्यालय शनिवारी रात्री चोरट्यांनी एकाच वेळी मारला आहे. यामध्ये बँक शाखेतील ५ लाख ८६ हजार रुपये रोख, १७ तोळे सोने तर पोस्टातील ६ हजार ३९० रुपये रोख लंपास केले आहेत. वीज वितरण कार्यालयात मात्र चोरट्यांना काहीच हाती लागले नाही. एकाच रात्री, एकाच ठिकाणी झालेल्या या तीन चोरी चोरीच्या घटनाने तालुक्यासह सीमाभागात खळबळ उडाली आहे.