प्रतिनिधी /वास्को
हरिद्वार येथील स्वामी यज्ञदेवजी यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ चिकित्सा शिबिर नवेवाडे वास्को येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आले. या शिबिरात 55 साधकांनी सहभाग घेतला.
यज्ञ केल्याने मुनष्य जीवनात कसा फायदा होतो याबद्दल स्वामीजींनी मार्गदर्शन केले. यज्ञाने मानसिक शांतता प्राप्त होते. वाढत्या प्रदुषणांमुळे अनेक आजार पसरत असतात. यज्ञ आणि हवन केल्याने आपल्या घराची हवा शुद्ध होते. वातावरणातील धोकादायक जीवाणू नष्ट होतात. यज्ञामध्ये अनेक गोष्टींचा वापर केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हवनातील धुरांमळे व्यक्तीचे मस्तिष्क, फेफडे व श्वास संबंधित समस्या दूर होतात. धार्मिकदृष्ठय़ा यज्ञ केल्य़ाने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. यातून नकारात्मकता दूर होते. घरातील वातावरणही शुद्ध होते. कुंडलीचे दोषही दूर होऊ शकतात.
हवन व यज्ञ एक प्रथा आहे. जी सर्वत्र भारतीयांच्या घरामध्ये होते. त्याचे महत्व मोठे आहे. हे काहीना माहिन नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी पोपटभाईजी, भारत स्वाभिमानचे लक्ष्मण जी, पतंजली योगचे रामाजी, महिला पतंजलीच्या रसिकाजी, सौमनसीजी, पुंडिलिकजी यांनी परिश्रम घेतले. गणेशजी यांनी आभार मानले.