प्रतिनिधी /बेळगाव
दि बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे खानापुरातील जुन्या आनंद प्रिंटिंग प्रेसचे मालक सदानंद श्रीपादराव कपिलेश्वरी यांना 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर (बापू) जाधव, सेपेटरी शाम मांगले, उपाध्यक्ष राजेंद्र भातकांडे, उपसेपेटरी संतोष होर्तीकर उपस्थित होते.
शाम मांगले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. असोसिएशनचे ज्ये÷ सभासद प्रा. अनिल चौधरी यांनी सदानंद कपिलेश्वरी यांच्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, सदानंद कपिलेश्वरी यांनी तरुण भारतमध्ये कम्पोझर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी दीपक मुद्रणालय येथे मॅनेजर म्हणून काम केले होते. तरुण भारत व हलकल्लोळचे लेखक ग. गो राजाध्यक्ष यांचे मदतनीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी केलेल्या कामाबद्दल असोसिएशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी असोसिएशनचे संचालक अशोक धोंड यांच्या हस्ते सदानंद कपिलेश्वरी व सुचिता कपिलेश्वरी यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक सतीश जाधव, नंदकुमार देशपांडे, विलास सावगावकर, अजित कोळेकर, रघुनाथ राणे यांच्यासह जिल्हय़ातील मुद्रक उपस्थित होते.