अनिल बेनके चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनिल बेनके स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित पाचव्या अनिल बेनके चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून साईराज वॉरियर्स संघाने शिवराज स्पोर्ट्स व सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाचा तर राहुल्स के. आर. शेट्टी संघाने अल रझा संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. ऊपेश गावकर, अक्षय पवार, ऋत्विक पाटील, राकेश यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सरदार्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने 10 षटकात 1 बाद 165 धावा केल्या. ऊपेश गावकरने 9 षटकार, 4 चौकारांसह 86, जॉनी फर्नांडिसने 4 षटकार, 4 चौकारासह 50 धावा केल्या. शिवराजतर्फे रघुने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवराज संघाने 10 षटकात 6 बाद 122 धावा केल्या. सय्यद बाडीने 51, इम्रान मुल्लाने 17 तर सुजू नाईकने 14 धावा केल्या. साईराजतर्फे अमोल व सूर्या यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात सरकार इलेव्हन गांधीनगर संघाने 10 षटकात 9 बाद 128 धावा केल्या. अक्षर पवारने 6 षटकार 2 चौकारांसह 52, किरणने 3 चौकार 3 षटकारासह 33 तर सूर्यकांत बापूने 17 धावा केल्या. श्र्री स्पोर्ट्स खडक गल्लीतर्फे रवि पिल्लेने 4 तर सुधीर व संदीप यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्र्री स्पोर्ट्स संघाने 10 षटकात 6 बाद 52 धावा केल्या. पंकज जाधवने 19 तर मिलिंद चव्हाणने 15 धावा केल्या. सरकारतर्फे अऊणने 2 तर सिब्बन, इरफान व मनोज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यात राहुल्स के. आर. शेट्टी संघाने 10 षटकात 3 बाद 130 धावा केल्या. ऋत्विक पाटीलने 44 तर अजित मोहितेने 38 धावा केल्या. अल रझातर्फे शाबाज व पाशा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अल रझा संघाचा डाव 9.4 षटकात 90 धावात आटोपला. मत्तीनने 38 तर इम्तियाजने 13 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे सोनूने 3, ऊपेश व अनुप यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात साईराज वॉरियर्सने 8 षटकात 5 बाद 114 धावा केल्या. अमोल निलगुडीने 3 षटकार, 3 चौकारांसह 43 तर प्रकाश खारने 4 षटकारांसह 32 धावा केल्या. सरकारतर्फे सिब्बन व अऊण यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सरकार गांधीनगरचा डाव 6.5 षटकात 43 धावात आटोपला. साईराजतर्फे सूर्या गावकरने 6 धावात 4 तर रोहन साळगावकरने 10 धावात 4 गडी बाद केले.
आजचे सामने
1) डेपो मास्टर्स वि. पोलीस इलेव्हन स. 9 वा. 2) मोहन मोरे वि. अयोध्या कडोली स. 11 वा. 3) रामराज्य इलेव्हन वि. एम. पी. बॉईज धोबीघाट यांच्यात दु. 12.45, 4) पहिल्या सामन्यातील विजेता वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता यांच्यात दु. 2.30 वा.