क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कोल्हापूर येथे निमंत्रितांच्या ऑल इंडिया जलतरण स्पर्धेत बेळगाव स्वीमर्स व अॅक्वॅरियस क्लबच्या जलतरणपटूंनी 18 सुवर्ण, 15 रौप्य व 11 कांस्यपदकांसह घवघवीत यश संपादन केले. त्याचप्रमाणे दोन खेळाडूंनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
कोल्हापूर येथे श्र्रीमंत छत्रपती शाहू महाराज अमृतमहोत्सवी आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत जवळपास 500 हून अधिक जलतरणपटूंनी भाग घेतला होता. यामध्ये बेळगावच्या अमन सुणगार व सुनिधी हलकारे यांनी या स्पर्धेत वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. अमन सुणगारने 7 सुवर्ण, सुनिधी हलकारेने 5 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्यपदक, तनिष्का मोरेने 4 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्यपदक, वेदांत मिसाळे 1 सुवर्ण 1 रौप्य, निधी कुलकर्णी 1 सुवर्ण, सार्थक श्र्रेयकरने 3 रौप्य, 2 कांस्य, अनिष पै ने 3 रौप्य व 1 कांस्यपदक, समृद्धी हलकाराने 3 रौप्यपदक, समीक्षा घसारीने 2 रौप्य, 1 कांस्य, अनन्या पै ने 3 कांस्य, यशराज पावशे व अद्वैत दळवी यांनी प्रत्येकी 1 कांस्यपदक पटकाविले. वरील सर्व खेळाडू जेएनएमसीच्या जलतरण तलावात सराव करीत असून त्यांना जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्मय मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतीकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.