नवी दिल्ली
स्कोडाची घाऊक विक्री जुलै 2022 मध्ये 44 टक्क्यांनी वाढून 4,447 युनिट्सवर पोहोचली आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने जुलै 2021 मध्ये डिलर्सना 3,080 वाहनांचा पुरवठा केला होता. स्कोडा इंडियाचे ब्रँड डायरेक्टर जॅक हॉलिस यांनी एका निवेदनामध्ये सांगितले आहे, की पावसाळय़ापसून सणासुदीच्या हंगामापर्यंत मोठय़ा खरेदीला स्थगिती दिली जाते. असे असूनही, आम्ही भारत 2.0 साठी कार बनविल्या आहेत. कुशक आणि स्लाव्हिया यांनाही जोरदार मागणी होत असल्याचे हॉलिस यांनी स्पष्ट केले आहे.