मार्व्हलचा आगामी शो ‘शी-हल्क ः ऍटर्नी ऍट लॉ’चा एक नवा ट्रेलर कॉमिक-कॉन 2022 दरम्यान सादर करण्यात आला आहे. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर 17 ऑगस्टपासून स्ट्रीम करण्यात येणार आहे. यात चार्ली कॉक्सच्या काही नव्या डेयरडेव्हिल कॅरेक्टर्सना दर्शविण्यात येणार आहे.
ट्रेलरमध्ये तातियाना माल्सनी दिसून येते. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा हा शो जेनियर वाल्टर्सच्या अवतीभोवती घुटमळणारा आहे. शोमध्ये मार्क रफालो हल्कच्या भूमिकेत दिसून येणार आहे. याचबरोबर टिम रोथ, एमिल ब्लोंस्की/द एबोमिनेशनच्या स्वरुपात झळकणार आहे. बेनेडिक्ट वोंग, जिंजर गोंजागा, जोश सेगर्रा, जमील जमील, जॉन बास आणि रेनी एलिस गोल्ड्सबेरी यात दिसून येतील. मार्व्हलच्या मिस मार्व्हलचा पहिला सीझन संपल्यावर आता 17 ऑगस्टपासून शी हल्कचा प्रीमियर केला जाणार आहे. याचबरोबर लवकरच कॉक्सची सीरिज देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
याचबरोबर कॉमिक कॉनमध्ये मार्व्हल स्टुडिओजच्या दोन नव्या ‘एवेंजर्स’ चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिला चित्रपट 2 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी झळकणार आहे.