कोल्हापूर: महाविकास आघाडीचे व शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव करत भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यानंतर संभाजीराजें छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी, शिवसेना आणि खास करून संजय राऊत यांना सणसणीत टोला लगावला आहे. ‘शिवसेनेच्या गर्वाचे घर खाली,’वाचाळवीर संजय राऊत आता कसं वाटतंय?…गार गार वाटतंय..अशी पोस्ट व्हायरल करण्यात आलीय.
नेमकी काय आहे पोस्ट?
शिवसेनेचे गर्वाचे घर खाली…..
वाचाळविर संजय राऊत आता कसं वाटतयं… गार गार वाटतयं……
पक्षाच्या नावात “शिव” वापरुन रॉयल्टी खाललीत आता शिवसेनेला शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी खाऊन देणार नाही.
संभाजीराजेंना शिवबंधन बांधायला सांगणारे मागील ३० वर्षांपासून शिवबंधन बांधलेल्या कार्यकर्त्याला निवडून आणू शकलेले नाहीत.
छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेने बिनशर्त खासदार करावं अशी अनेक आमदारांची सुप्त इच्छा होती. परंतु शिवसेनेने शब्द फिरवल्याने आणि नाहक अटी शर्ती घातल्याने ते शक्य झाले नाही.
पण छत्रपती घराण्याचा अपमान सहन न झालेल्या आमदारांनी शिवसेना, वाचाळवीर संजय राऊत आणि महाविकासघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवुन दिली.
संभाजीराजेंना जर अपक्ष परंतु पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती.
पक्षाच्या नावात “शिव” वापरुन रॉयल्टी खाललीत आता शिवसेनेला शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी खाऊन देनार नाही – छावाप्रमुख धनंजय जाधव ( संभाजीराजे समर्थक )