वार्ताहर /सांबरा
सांबरा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेतील सन 2000-01 या वर्षातील माजी विध्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष महादेव अष्टेकर होते.
ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भैरू जत्राटी यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका व्ही. एम. तानुगोळ, एस. एल. किल्लेकर, जे. जी. माने, एम. बी. भोसले, एच. वाय. काजोलकर, गीता नाईक, अनिता पाटील, रेणुका लोहार, तुळसा पाटील, चिगरे टीचर, सीआरपी एस. वाय. कुरबर, शिक्षक बी. वाय. कोलकार, मेत्रे सर, मेणसे सर, एम. बी. चिंगळी, अशोक पागाद, विलास कंग्राळकर, महादेव अष्टेकर, एसडीएमसी उपाध्यक्षा सुमन गिरमल आदींचा शाल, श्रीफळ आणि फुलांची रोपे देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना उपस्थित शिक्षकांनी मार्गदर्शन
केले.
भूषण जाधव, दीपा गिरमल, नागुली ओसाप्पाचे, पुष्पा गिरमल, नागेश गुरव यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. विध्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला प्रोजेक्टर भेट दिला. ज्योती गिरी यांनी सूत्रसंचालन तर कांचन जोगाणी हिने आभार मानले.
स्नेहमेळाव्यास कृष्णा पाटील, वासू सोनजी, दीपक जोई, सागर मटार, शिवाजी जाधव, सुधा अप्पयाचे, ज्योती जोगाणी, रेखा जाधव, भारता जोई, प्रभावती हणमाई, मंदाकिनी कलखांबकर, सावित्री चिंगळीसह माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.