मनोज पवार/ दापोली
रायगड जिह्यातील हरिहरेश्वर व भरडखोल समुद्रकिनारी शस्त्रास्त्र असलेल्या 2 संशयास्पद नौका किनाऱयाला वाहून आल्या. या घटनेने देशभर खळबळ उडाली. मात्र यामुळे दापोली तालुक्यात तब्बल 19 वर्षांपूर्वी समुद्रातून शस्त्रास्त्रांसह वाहत आलेल्या एलन-थ्री या ऑस्ट्रेलियन नौकेच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
जुलै 2003 मध्ये भरपावसात अरबी समुद्रातून एलन-थ्री बोट वाहत दापोली तालुक्यातील येऊन खडकात अडकली होती. याची बातमी सर्वप्रथम ‘तरुण भारत’नेच प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडून व सर्व शासकीय यंत्रणांची झोप उडाली. या बोटीवर अत्याधुनिक शस्त्रs, संपर्क यंत्रणा, नकाशे आदी संशयास्पद गोष्टी आढळल्याने या नौकेबद्दल अनेक उलटसुलट बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या होत्या.
काही दिवसांनी बातम्यांचा धुरळा खाली बसल्यानंतरदेखील ‘तरुण भारत’ने या नौकेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. यात ही नौका लंडन स्थित ऑस्ट्रेलियन नागरिक मार्क रेडफोर्ट व ल्युसी रेडफोर्ट यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. हे दोघे समुद्रातून जगभ्रमंतीला निघाले असता अरबी समुद्रात नौका धुवांधार पावसामुळे भरकटली. दोन दिवसांनी या बोटीजवळून जाणाऱया मालवाहू जहाजाच्या कप्तानाने त्यांची बोट जहाजाला बांधली. मात्र बोट हेलकावे खाऊ लागल्याने जहाजाच्या कॅप्टनने रेडफोर्ट दांपत्याला जहाजावर घेतले व एलन- थ्रीचे दोरखंड कापून टाकले. ‘तरुण भारत’नेही या सर्व गोष्टी त्यावेळी पुराव्यासह समोर आणल्या. यामुळे ही बोट दहशतवाद्याशी संबंधित नसून जगभ्रमंतीला निघालेल्या रेडफोर्ट दांपत्याची असल्याचे पुढे आले. या कामी ‘तरुण भारत’ला रत्नागिरीतील कॅप्टन दिलीप भाटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.
रायगड किनाऱयावरदेखील गुरुवारी लेडीहॉर्न नौका अरबी समुद्रातून वाहून आली आहे. त्या बोटीवरही अत्याधुनिक शस्त्रास्त्रs, यंत्रणा सज्ज आहे. या बोटीबद्दलदेखील बऱयाच शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे ही नौकाही एलन-3 च्या मार्गानेच जाणार, असा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे.