सांगली- जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथे आज सकाळी फारणेवाडीरोडला गवा दिसल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भरवस्तीत हा गवा दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वनविभागाने याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ, शेतकरी यांनी केली आहे.
या बाबत गावाचे लोकनियुक्त सरपंच उत्तम गावडे व त्यांचे सहकारी यांनी पोलीस प्रशासन, वन विभाग यांना कळवले आहे. वन विभागाची टीम पोहचत आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पण शिगाव गावात गवा आलाच कुठून? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी वडगाव (ता.हातकणंगले) येथे गवा दिसला होता. त्या नंतर वडगाव परिसरात गव्याचा चक्क कळपच दिसला होता. कदाचित त्यातीलच एक गवा नदी ओलांडून किंवा पुलावरून पहाटे शिगाव गावात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजून पर्यंत त्याने कोणालाही नुकसान पोहचवले नाही. सध्या गवा शिगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील ऊस शेतीत बसला आहे. अशी माहिती मिळाली आहे. शिगाव गावात गवा दिसल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.