क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
भुवन श्रीनिवास शानभाग स्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात येणाऱया टिळकवाडी विभागाच्या माध्यमिक क्रीडा स्पर्धांना 28 जुलैपासून सांघिक खेळांनी प्रारंभ करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
चन्नम्मानगर येथील भुवन श्रीनिवास शानभाग स्कूलच्या सभागृहात आयोजित शारीरिक शिक्षकांच्या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून शालेय मंडळाचे उपाध्यक्ष अजित यादव, शहर शारीरिक शिक्षणाधिकारी सौ. जी. बी. पटेल, एल. बी. नाईक, टिळकवाडी विभागिय क्रीडा संघटनेचे सचिव एस. बी. पाटील, शानभाग स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगला अणवेकर आदी व्यासपिठावर उपस्थित होत्या.
प्रारंभी स्कूलच्या विद्यार्थीनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. जी. बी. पटेल यांनी खेळाबद्दलची माहिती सांगितली तर एल. बी. नाईक यांनी ही स्पर्धा टिळकवाडी विभागीय क्रीडा संघटनेने सुरळीत पार पाडण्याचे आवाहन करत नियम व अटी सांगितल्या. या बैठकीत माध्यमिक विभागाच्या सांघिक व ऍथलेटीक्सचे वेळापत्रक ठरविण्यात आले.
28 जुलै रोजी बास्केटबॉल डी. पी. स्कूल येथे, 30 जुलै रोजी टेबलटेनिस केएलएस स्कूल येथे, 1 ऑगस्ट रोजी योगा व बुद्धीबळ केएलएस स्कूल येथे, 4 ऑगस्ट रोजी व्हॉलिबॉल व कब्बडी केएलएस स्कूल येथे, 8 ऑगस्ट रोजी बॅडमिंटन ओरिएंटल स्कूल येथे, 10 ऑगस्ट रोजी हॅण्डबॉल केएलएस स्कूल येथे, 12 ऑगस्ट रोजी क्रिकेट व बॉल बॅडमिंटन डेपो मैदान येथे, 17 व 18 ऑगस्ट रोजी फुटबॉल मुला-मुलींसाठी लेले मैदानावर घेण्यात येणार आहे. ऍथलेटीक्स स्पर्धा 23-24 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात येणार आहे. या बैठकीला उमेश बेळगुंदकर, प्रवीण पाटील, रामलिंग परिट, संजय सॉलोमन, विठ्ठल, सिल्व्हीया डिमेलो, धनसिंग धनाची, चिदानंद असोदे, अर्जुन भेकणे, संतोष दळवी, बुडवी, सोमशेखर हुद्दार, सी. आर. पाटील, यू. मजुकर आदी उपस्थित होते. संतोष दळवी यांनी आभार मानले.