सांगली प्रतिनिधी
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची एकतर्फी विजयाकडे वाटचाल सुरू असून महाविकास आघाडीचे अठरा पैकी पंधरा उमेदवार तीनशे ते चारशे मताच्या फरकाने आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चेंबरच्या दोन जागा पैकी सुरुवातीला विजय झालेले सुशील हडदरे फेरमतमोजणीत मात्र पराभूत झाले. महाविकास आघाडीची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याने सांगली मिरज जत आणि कवठेमंकाळ शहरात कार्यकर्ते आणि जल्लोषाला सुरुवात केलेली आहे.