वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताच्या सानिया मिर्झाने झेकच्या ल्युसी ऱहॅडेकासमवेत पेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली तर रामनाथन रामकुमारचे पुरुष दुहेरीतील आव्हान दुसऱया फेरीत समाप्त झाले.
सानिया मिर्झा व ल्युसी ऱहॅडेका यांनी इटलीच्या जस्मिन पाओलिनी व मार्टिना ट्रेव्हिसन यांच्यावर 4-6, 6-2, 6-1 अशी मात करीत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. सुमारे दोन तास ही लढत रंगली होती. पुरुष दुहेरीत रामकुमार रामनाथन व त्याचा अमेरिकन जोडीदार हंटर रीस यांना सहाव्या मानांकित वेस्ली कूलहॉफ व नील स्कुपस्की या डच-ब्रिटन जोडीकडून 3-6, 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला. रोहन बोपण्णा व डचचा मॅटवे मिडेलकूप यांनी पुरुष दुहेरीची याआधीच उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.